बॅनर मुखपृष्ठ राष्ट्रीय

अखेर 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तारीख ठरली

नवी दिल्ली :  नव्या 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तारीख ठरली आहे. मात्र, तारखेची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे 200 रुपयांच्या नोटांसाठी एटीएम मशिनमध्ये कोणतेही बदल करण्याची गरज भासणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

200 रुपयांच्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. ही नोट चलनात आणण्याची तारीखही ठरवण्यात आली आहे . चलनात आल्यानंतर 200 रुपयांच्या नोटांची कमी भासू नये, यादृष्टीने छपाईचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार 200 रुपयाच्या नोटांचा असेल, त्यामुळे एटीएम मशिनमध्ये काहीही बदल करण्याची गरज भासणार नाही. 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या त्यावेळी एटीएम मशिनमध्ये बदल करावे लागले. कारण या नोटांच्या आकारात बदल होता.

Advertisement