टॉप न्युज ताज्या बातम्या प्रॉपर्टी मुख्य बातम्या

घराची तोडफोड न करता वास्तूदोषाचे असे करा निवारण

कित्येकदा आपण आपल्या आवडीनुसार घर सजवतो. घर सजवताना आपण प्रत्येक वेळी वास्तुशास्त्राचा विचार करत नाही. मात्र कधी कधी काही जणांना अशा घरात राहायला गेल्यावर समस्या जाणवायला लागतात. पण तेव्हा तोडफोड करणं शक्‍य नसतं. मात्र काही गोष्टी केल्याने हे दोष आपण नक्कीच टाळू शकाल. ते पुढीलप्रमाणे…

वास्तू दोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तू भंगाचा दोष लागतो.

तुमचा बेड उलटया दिशेला असेल आणि तुम्ही त्याची जागा बदलू शकणार नसाल तर तुम्ही तुमच्या बेडच्या समोर एक आरसा लावा.

घराच्या आग्नेय कोप-यात स्वयंपाकघर असणं अतिशय शुभं मानलं जातं. मात्र तसं नसल्यास तुम्ही त्या दिशेला गॅसची शेगडी ठेवू शकता. पण हेही शक्‍य नसेल तर या दिशेला पिवळ्या रंगांचा एक बल्ब लावावा. तसंच तो बल्ब नेहमी जळता ठेवावा. असं केल्याने वास्तू दोष नाहीसा होतो.

घराची पूर्व दिशा अन्य दिशांपेक्षा अधिक उंच असेल तर हा दोष हटवण्यासाठी पूर्व दिशेला लोखंडाचा पाईप लावावा. घराच्या दक्षिण-पश्‍चिम भागात जड वस्तू तर उत्तर-पूर्व भागात हलक्‍या वस्तू ठेवणं आवश्‍यक आहे.

मुख्य दरवाजा आग्नेय दिशेला किंवा पूर्व-दक्षिण कोप-यात अग्नीचं स्थान असेल तर मुख्य दरवाजावर गडद लाल रंग लावावा. किंवा दरवाजावर लाल रंगांचे पडदे लावावेत. म्हणजे या दोषाचं निवारण होईल. दरवाजावर बाहेरच्या बाजूला सूर्याचं चित्रं लावावं आणि शक्‍य झाल्यास पूर्व-आग्नेय कोप-यांतले दरवाजे बंद करा.

स्वयंपाकघराच्या दरवाजासमोर बाथरूमचा दरवाजा असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा असते. मात्र बाथरूम आणि स्वयंपाकघराच्या मध्ये एक पडदा लावणं शक्‍य झालं तर अवश्‍य लावावा. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या समोर येणार नाहीत. घरात विशेषत: छताच्या बाजूला भंगार किंवा तुटलेलं, फुटलेलं सामान अजिबात ठेवू नका.

घरात कान तुटलेले किंवा भेगा पडलेले कप, स्टीलची किंवा काचेची अथवा प्लास्टिकची भेगा गेलेली भांडी, बंद पडलेली घडयाळं ठेवू नयेत. अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात.

रोज सकाळी पाण्यात थोडेसं मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मन:शांती लाभते, तसंच घरात कीटक, माशा येत नाहीत.

दिवे लागल्यावर कधी झाडू मारू नये. सूर्योदय किंवा सूर्यास्तापूर्वी झाडू मारावा. त्यामळे घरात दारिद्रय येत नाही.

Advertisement