टॉप न्युज मुख्य बातम्या राष्ट्रीय

दिल्लीच्या सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार 70 टक्के कमी झाला-केजरीवाल

नवी दिल्ली – आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यानंतर दिल्लीच्या सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार 70 टक्के कमी झाल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

डीएबी(दिल्ली विद्युत बोर्ड) पेन्शनर्स असोसिएशनच्या दिनानिमित्त एका कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या सरकारच्या कार्यात अनेक अडचणी आणण्यात येत आहेत, असा आरोप करून ते पुढे म्हणाले, की तरीही सरकार जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न करतच आहे.

भ्रष्टाचार 100 टक्के नष्ट झाला आहे असा माझा दावा नाही, पण तो 70 टक्के कमी झाला आहे, असे त्यांने सांगितले. डीएबीच्या पेन्शनर्ससाठी कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंटची योजना दिल्ली सरकारने सुरू केले आहे, असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. पीडीसी (पॉवर डिस्ट्रिब्यूशन कंपनी) पेन्शनर्स फंडामध्ये वेळेवर निधी जमा करत नाही. त्यामुले पेन्शनचे वितरण करण्यास उशीर होतो, असे त्यांनी सांगितले. यापुढे मात्र असे निधी डीईआरसी (दिल्ली इलेक्‍ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन) मार्फत जमा केले जातील असे त्यांनी सांगितले.

Advertisement