क्रीडा मुख्य बातम्या राष्ट्रीय

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू बनली उपजिल्हाधिकारी

हैद्राबाद – रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आंध्र प्रदेशच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्त झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सिंधूला दिलेले आश्‍वासन पाळत त्यांनी तिला सचिवालयात आमंत्रित करून तिचा सत्कार करत उपजिल्हाधिकारी पदाचे नियुक्ती पत्र दिले. त्यामुळे आता सिंधू प्रशासनातही आपला ठसा उमटवणार आहे.

चंद्रबाबू नायडू यांनी ट्‌विटरवरून ही माहिती दिली. सोबत त्यांनी सिंधू सोबतच एक फोटो ही ट्‌विटरवर टाकला आहे. पीव्ही सिंधू ही आपल्या देशासाठी एक आदर्श आहे. तिच्या वाटचालीत येणारे प्रत्येक शिखर ती पार करेल असे ट्‌विट नायडू यांनी केले आहे. नायडू यांच्या ट्‌विटनंतर सिंधुनेही आपण देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करणार असा विश्वास दाखवून तिने सर्वांचे आभार मानले. दरम्यान, 2013 पासून सिंधू भारत पेट्रोलियममध्ये सहायक व्यवस्थापक या पदावर काम करत होती. मात्र आता उपजिल्हाधिकारी पदावर तिची नियुक्ती झाल्याने तिने भारत पेट्रोलियममधील नोकरी सोडली आहे.

Advertisement