आंतरराष्ट्रीय मुख्य बातम्या

बेपत्ता भारतीयांबद्दल कोणतीही माहिती नाही- इराक

 

नवी दिल्ली – इराकमधील मोसूल शहरामध्ये बेपत्ता झालेल्या 39 भारतीय नागरिकांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे इराकने म्हटले आहे. इराकचे विदेश मंत्री इब्राहिम अल इशाइकर अल जफारी यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 वर्षांपासून हे 39 भारतीय मोसूलच्या परिसरातून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधाबद्दल भारताच्या विदेश मंत्रालयाने इराकशी संपर्क साधला होता. मात्र हे 39 भारतीय नागरिक जिवंत आहेत की मृत झाले आहेत, याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

हे नागरिक जिवंत असल्याचा कोणताही सबळ पुरावाही उपललब्ध नाही. तरीही त्यांच्या शोधासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे जफारी यांनी सांगितले. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबरोबरच्या चर्चेनंत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अल जफारी हे 5 दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. इराकी सैन्याने मोसूल शहर इसिसच्या ताब्यातून सोडवल्यानंतर भारताने या 39 भारतीयांबद्दल इराककडे विचारणा केली होती. यापैकी बहुतेक भारतीय नागरिक पंजाबमधील आहेत आणि 3 वर्षांपूर्वी त्यांचे अपहरण झाले होते.

Advertisement