क्रीडा मुख्य बातम्या राष्ट्रीय

भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 291 धावांत गुंडाळले

* भारताकडे  तब्बल 309 धावांची आघाडी
गॉल :
 गॉल कसोटीत भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला अवघ्या 291 धावांत गुंडाळले. दरम्यान, तिसऱ्या दिवशी चहापानाला केवळ अर्धा तास असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला आहे. खेळ थांबला त्या वेळी भारताने दुसऱ्या डावात दोन बाद 56 धावा केल्या आहेत. सलामीचा शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले.
त्याआधी भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला अवघ्या 291 धावांत गुंडाळून पहिल्या डावात तब्बल 309 धावांची आघाडी घेतली. पण एवढ्या मोठ्या आघाडीनंतरही भारताचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेवर फॉलोऑन न लादण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या दिलरुवान परेरानेही नाबाद 92 धावांची झुंजार खेळी केली. पण भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या डावात मोठ्या भागिदाऱ्या होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे श्रीलंकेचा डाव 291 धावांत आटोपला. भारताकडून रवींद्र जाडेजाने 67 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडले. मोहम्मद शमीने दोन, तर उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Advertisement