आंतरराष्ट्रीय मुख्य बातम्या

मालदिवची संसद सरकारनेच बंद केल्याचा विरोधकांचा आरोप

कोलोंबो- मालदिवच्या अध्यक्षांनी सैन्याच्या मदतीने संसदच बंद केली असल्याचा आरोप आज तेथील विरोधकांनी केला आहे. संसदेच्या अध्यक्षांना हटवण्याच्या ठरावावरच्या मतदानापासून खासदारांना रोखण्यासाठी सभापती यमीन अब्दुल गय्युम यांनी संसदेचे प्रवेशद्वारच बंद करून घेतल्याचा आरोप मालदिवमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मालदिवन डेमोक्रॅटिक पार्टीने केला आहे. अध्यक्षांची ही कृती आततायी, बेकायदेशीर आणि असंविधानिक असल्याचेही विरोधकांनी म्हटले आहे. मात्र सरकारच्यावतीने या आरोपाबाबत कोणतीही प्रतिक्रिया त्वरित उपलब्ध होऊ शकली नाही.

संसदेचे सभापती अब्दुल्ला मसीह मोहमेद यांच्याविरोधात आज अविश्‍वसनीय ठराव दाखल केला जाणार होता. त्याला 85 पैकी 45 खासदारांचा पाठिंबा होता, असा विरोधकांचा दावा होता. मात्र सत्ताधारी पक्षातून बाहेर पडलेल्या चार सदस्यांचे सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द ठरवल्यामुळे या ठरावाबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली होती. या ठरावानुसार सभापतींना हटवण्याचा ठराव मंजूर झाला असता तर ती अध्यक्षांची मोठी नाचक्की ठ्रली असती.

Advertisement