अर्थ अस्मिता आरोग्य जागर करिअरनामा गंधर्व टॉप न्युज फोटोगॅलरी मनोरंजन मुख्य बातम्या युफोरिया युसेल्फि राष्ट्रीय रूपगंध लाईफस्टाइल

सरकारने शाळा, कारागृह चालविणे सोडावे…

निती आयोग: पायाभूत सुविधा क्षेत्रातूनही बाहेत पडावे
नवी दिल्ली- सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्र विकासनातून बाहेर पडावे. एवढेच नाही तर कारागृह व्यवस्थापन, शाळा महाविद्यालयानाही खासगी क्षेत्राकडे सोपवावे असा सल्ला निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सरकारला दिला आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या देशात अश्‍याच पध्दतीने काम चालते असा दाखला त्यांनी दिला आहे.

एकीकडे सरकारच्या अखत्यारीतील ही कामे खासगी क्षेत्राकडे सोपवावी असे सांगत असतांनाच त्यांनी खासगी क्षेत्रावरही बेजवाबदारीचा आरोप केला. ते म्हणाले की खासगी क्षेत्र असंवेदनाशील आहे आणि त्यांच्या कामात सलगता नाही. खासगी क्षेत्राने आक्रमक प्रयत्न करून सरकारी – खासगी संयुक्त प्रकल्पाची कामे मिळविली मात्र ती व्यवस्थीत न केल्यामुळे आताचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

ते म्हणाले की बीओटी म्हणजे निर्माण करा, वापरा आणि हस्तांतरीत करा अश्‍या पध्दतीने गेल्या काही काळापासून काम चालू आहे. सरकारने काही मोठे प्रकल्प निर्माण केले आहेत. मात्र सरकारला त्याची देखभाल करता आलेली नाही. त्यामुळे आता बीओटीला उलटे करण्याची गरज निर्माण झालेली आहे. म्हणजे सर्व काही खासगी क्षेत्रावर सोपऊन सरकारने मोकळे होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले.

फिक्की या उद्योजकांच्या संघटनेने आयोजीत केलेल्या सरकार आणि खासगी क्षेत्राच्या भागीदारीवरील शिखर बैठकीत बोलतांना ते म्हणाले की विमानतळावरील अस्वच्छता विमानतळे एअरपोर्ट ऍथॉरिटी चालवित असल्यामुळे आहे. तेथे खासजी क्षेत्राकडे काम सोपविण्याची गरज आहे. पायाभूत सुविधाची कामे खासगी क्षेत्राकडे सोपविल्यानंतर भांडवलाचा काटकसरीने वापर होईल असे त्यांनी सांगीतले.

ते म्हणाले की खासगी – सरकारी सहकारी क्षेत्राच्या नव्या युगात आपण जाण्याची गरज आहे. सरकारने शाळा, कारागृहे आणि महाविद्यालये चालविण्याची गरज नाही. बऱ्याच विकसीत देशात ही कामे खासगी क्षेत्र चांगल्या प्रकारे करीत असल्याचे दिसून येत आहे. आपण तो प्रयोग करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले.

ते म्हणाले की खासगी क्षेत्राने करण्यासारखी भारतात मोठ्या प्रमाणात कामे आहे. त्यात स्थानकांची फेरउभारणी, बंदर विकास, सागरमाला प्रकल्पातील कामाचा समावेश आहे. देशात पुरेसे भांडवल आहे. त्यामुळे सरकारने अपल्याकडील कामे खासगी क्षेत्राकहे सोपऊन द्यावीत. मात्र ही कामे सोपवितांना योग्य कंपनीकडे योग्य पध्दतीने सोपविण्याची गरज आहे. फ्राईट कॉरीडॉरची कामेही खासगी कंपन्याकडे सोपविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. कॉरीडॉरचे काम पुर्ण झाल्यानंतर रेल्वेचा 14 दिवसाचा प्रवास चौदा तासात होणार आहे.

मात्र एकीकडे सरकारकडील कामे खासगी क्षेत्राकहे सोपवावी असे सांगत असतांनाच त्यांनी आतापर्यंत खासगी क्षेत्रानही कामे चांगली केली नसल्याचे सांगीतले. रस्ते आणि कोळसा खाणीची कामे खासगी क्षेत्राने मिळविली मात्र तर पुर्ण केली नाहीत. त्यामुळे वेळ वाया गेला आहे. आपल्याला शक्‍य होईल तेवढेच काम या क्षेत्रातील कंपन्यानी घ्वावे असे त्यांनी सांगीतले. त्यानी यावेळी दिल्ली -जयपुर या रखडलेल्या महागार्गाचे उदाहरण दिले.

Advertisement